गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील मांगलेवाडी येथे पोलीस संरक्षणात सुरू असलेले मोबाईल टॉवरचे काम नवज्योत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले.
मांगलेवाडी येथे नवज्योत तरुण मंडळाच्या पाठीमागील बाजूस रिंगरोडमध्ये मोबाईल टॉवरचे काम सुरू होते. याची माहिती नवज्योत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिळताच मंडळाचे संस्थापक संतोष मांगले यांनी तातडीने सदर जागी जाऊन पाहणी केली. त्यांनी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाला याबाबत कल्पना दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन संबंधित टॉवरचे काम थांबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नवाब मालदार, बाळासाहेब वडर,सुधाकर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. वेळीच हे काम थांबविण्यात आल्याने मांगलेवाडी व गवळीवाडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

