Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री फेलोशिप 2023 - अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 मार्च पर्यंत


मुंबई  :
युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुखमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, विद्यार्थ्यांना 2 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुलामुलींना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गती यांचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो, त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. या 2015 ते 2020 या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरु करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री फेलोशिप 2023 साठी अर्ज करण्यासाठी वय 21 ते 26 वर्षे, ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव असे किमान निकष आहेत. ऑनलाईन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. आलेल्या अर्जांमधून 60 युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील. 

आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे अकॅडेमिक पार्टनर आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांचेकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल. 

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी  cmfellowship-mah@gov.in या ईमेल वर किंवा ८४११९६०००५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.