Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी पेन्शन अदालत


मुंबई :
मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेन्शन अदालत दिनांक16-03-2023  रोजी 11.00 वाजता  मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400 001 येथे आयोजित केली आहे.

निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मध्ये विचार केला जाईल.

पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांची प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या  पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपल्या अर्जाच्या तीन प्रति, लेखा अधिकारी / सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001 ला 15-02-2023 रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रुपने (एकगठ्ठा/इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकतात. 15-02-2023 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही. असे कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.