गडहिंग्लज (प्रतिनिधी): कौलगे येथे ५० बांधकाम कामगारांना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने सुरक्षा पेटीचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुका प्रमुख दिलीप माने, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सचिन पोवार, सागर गुरव, गजानन पोवार, गजानन आर्दाळकर, सचिन आर्दाळकर,शिवाजी पोवार, ज्ञानदेव साठे, रुपेश कुराडे, सुधाकर येसरे यांच्यासह शिवसैनिक व बांधकाम कामगार उपस्थित होते.




