Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- बांदा महामार्ग वहिवाटीचे आजरा तालुक्यात झाले मोजमाप


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटना व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सध्याच्या वहिवाटीप्रमाणे मोजमाप करण्यात आले.

मडिलगे, हाजगोळी, गवसे, धनगरमोळा, सुळीरान या ठिकाणी सध्याची वहिवाटीची खात्री करण्यात आली. वहिवाट म्हणजे शंभर वर्षे पूर्वीच्या झाडांच्या आत दोन्ही बाजूची अस्तित्वात असणारी साईडपट्टी व डांबरीकरण असे संघटनेचे  म्हणणे आहे. याप्रमाणे मोजणी केली असता काही ठिकाणी आठ मीटर काही ठिकाणी 9 ते 11 मीटर असे दिसून आले मात्र महामार्ग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गटारीपासून वहिवाटेची मोजमाप करण्यात आली. यामध्ये काही ठिकाणी आठ मीटर ते पंधरा मीटर असे दिसून आले. झाडांच्या पलीकडे वहिवाट कशी असू शकते?, वाहन जाण्याचे ठिकाण म्हणजे वहिवाट आहे. मग ते  झाडावरून कसे जाऊ शकते असे मत संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी व्यक्त केले.

सदरच्या मोजणीकडे महसूल विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागा यांनी पाठ फिरवली हे दुर्दैवी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

मोजणीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता मदन फडतरे, सुधीर घोटकर यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष कॉमेडी शिवाजी गुरव, घाटकरवाडीचे माजी सरपंच गोविंद पाटील, सुळेरानचे माजी सरपंच चंद्रकांत जाधव, शिवाजी इंगळे, गणपती येसणे, जॉन बारदेस्कर, महादेव जाधव यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.