महागाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागावला सुसंस्कृत इतिहास लाभलेला आहे. येथील लोक वैचारिक आहेत. गेल्या तीन वर्षांत गटातटाचे राजकारण न करता विकासकामांना प्राधान्य दिलो असून यापुढेही मतांचे राजकारण न करता विकासकामांना गती देणार आहे असे प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.
महागाव( ता. गडहिंग्लज) येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, माजी जि .प. सदस्य शिवप्रसाद तेली, रामाप्पा करिगार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पाटील पुढे म्हणाले, आता मतदारांना चांगले वाईट कळते. त्यामुळे ते विकास काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महागावसाठी सात कोटीची विकास कामे केली आहेत. आज महागाव मधील झालेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये आमदार फंडातून महागाव पाचरस्ता येथील दुतर्फा सिमेंट काँक्रिटची गटारे बाधणे, कामत ओढा पुलाचे नवीन बांधकाम व रुंदीकरण, रामतीर्थ पाझर तलावाचे खोलीकरण व सुशोभीकरण, गावांतील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण व इतर ठिकाणी सुरू आसलेल्या अनेक विकास कामांचे उदघाटन व पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, रामाप्पा करिगार यांची भाषणे झाली. जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, सरपंच प्रशांत शिंदे, विकी कोणकेरी, मुन्नासाहेब नाईकवाडे, बशीर पठाण, नरसिंग गुरव, शिवप्रसाद तेली, शिवाजीराव माने, दशरथ कुपेकर, बाबुराव चौगुले, स़जय रेडेकर, वैरागवाडी सरपंच पी. के. पाटील बाबुराव चौगुले यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थितीत होते. सुत्रसंचालन नरसिंग गुरव तर आभार बशीर पठाण यांनी मानले.



