शासनाच्या आरोग्य सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा : सरपंच सौ. योगिता संगाज
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित महाआरोग्य शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिर उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. योगिता संगाज होत्या.
यावेळी बोलताना सरपंच सौ. योगिता संगाज म्हणाल्या, हवेत वारंवार बदल होत आहेत. वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. शासनाच्या अनेक आरोग्य सेवा आहेत त्यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
पर्यवेक्षक बाळासाहेब कुंभार यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलिमा धबाले यांनी वयोवृद्ध नागरिक, गरोदर माता यांना मार्गदर्शन केले व आरोग्य शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी सुपरवायझर बी.ए.पाटील, आरोग्य सेविका अर्चना शिंदे, राजश्री सूर्यवंशी, रिया साळुंखे, के.जी.चौगुले, ए.जी. घेवडे, अनिल कांबळे, सरिता गोडसे, संगीता नाईक, परमेश्वर गायकवाड यांच्यासह आरोग्य सेवक, आरोग्यसेविका उपस्थित होत्या.





