![]() |
| (छायाचित्र: मज्जीद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): वडरगे (ता.गडहिंग्लज) येथे शिवराज महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन गडहिंग्लज महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सागर दांगट यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते.
स्वागत व प्रास्ताविक एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.पी.खेडकर यांनी केले.
उपकार्यकारी अभियंता सागर दांगट यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले पाहिजे तरच आपण टिकू शकतो. त्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षेतून अनेक व्यक्तीमत्वे कसे घडले हे जाणून घेतले पाहिजे.
प्रा.किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून शिवराज विद्या संकुल हि या भागाची सामाजिक संस्था आहे. या संकुलाने समाजाशी नाळ जोडली आहे. या भागातील अनेक विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
त्यामुळे शिवराजच्या माध्यमातून समाजाला उपयोगी असे कार्य विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे असे स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
यावेळी श्री मोरे-गुरुजी, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरपंच सुभाष पोटे यांनी शिवराज महाविद्यालयात आम्ही घडलो आहोत. शिवराजच्या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले जात आहे. शिवाय गावातील विविध उपक्रमांचा आढावा घेऊन त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आल्याचे स्पष्ट केले.
जि.प.बांधकाम विभागाचे उपअभियंता राहुल माळी, नितीन मोरे, उपसरपंच सौ. पुष्पा हजारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव पोवार, उपाध्यक्ष बाबासाहेब गोरुले, प्रा. विश्वजीत कुराडे, मुख्याध्यापक विलास माळी यांच्यासह शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार एन.एस.एस.चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.जी.जी.गायकवाड यांनी मानले.
![]() |
| (सर्व छायाचित्रे : मज्जीद किल्लेदार) |








