कणेरी मठ : येथे होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवासाठी कणेरी, कणेरीवाडी, गिरगाव, कंदलगाव, कोगील, वड्डवाडी येथे लोकोत्सव व्यवस्थापन समितीच्या प्रसार सभा झाल्या. या सभेत समिती सदस्यांनी ग्रामस्थांना धान्य- कडधान्य, चपाती -भाकरी, एक तट-वाटीसह अन्य मदत देण्याचे आवाहन केले. या आवाहनास ग्रामस्थ उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
लोकोत्सवास देश व परदेशातून सुमारे 30 लाख लोक येणार आहेत. कार्यक्रम ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मोफत जेवण देण्यात येणार आहे. सलग आठवडाभर हा कार्यक्रम सुरू राहणार असून प्रत्येक दिवशी सुमारे पाच लाख लोक येण्याची शक्यता आहे. इतक्या लोकांना लागणाऱ्या जेवणाची सोय व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांचे सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून व्यवस्थापन समितीतील सदस्य गट करून परिसरातील गावात जाऊन या कार्यक्रमाचा प्रसार आणि मदतीसाठी सहकार्य मिळवत आहेत. गावातील प्रत्येक घरातून पाच चपाती किंवा भाकऱ्या, एक ताट -वाटी, धान्य -कडधान्य, गाव सजावटीसाठी साड्या व अन्य साहित्य याचबरोबर मदत करण्याचे आवाहन सदस्यांनी सदस्य करत आहेत. त्याला ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देत आहेत.
सभेत डॉ. संदीप पाटील, एम. डी. पाटील, माणिक पाटील- चुयेकर, प्रताप कोंडेकर, सूर्यकांत पाटील, विक्रम पाटील यांनी मार्गदर्शन केले

