Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गोव्यात हेलिकॉप्टर-पर्यटन सेवा सुरू

ओल्ड गोवा येथील हेलिपॅडची केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत उभारणी


पणजी :
गोवा पर्यटन विभाग आणि मेसर्स सोअरिंग एरोस्पेस प्रा. लि.ने गोव्यात हेलिकॉप्टर-पर्यटन सेवा सुरू केली. दौजी-एला, ओल्ड गोवा येथील हेलिपॅड केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत बांधण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले की, दर्जेदार पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकार नेहमीच नवनवीन मार्गांचा शोध घेत आहे. उच्च श्रेणीतील पर्यटन सेवा उत्तम प्रकारे पुरवण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी हाच चांगला पर्याय असल्याचे ते म्हणाले. आज सुरु करण्यात आलेली हेलिकॉप्टर-सेवा हे या संकल्पनेचे उत्तम उदाहरण आणि राज्यात व्यवसाय सुलभतेचा पावती म्हणता येईल, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अमृत काळा’साठी योजलेल्या संकल्पनेनुसार राज्य सरकार आरोग्य, निरायम पर्यटनावरही भर देत आहे,  असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी गोवा पर्यटन विभागाने यावेळी कॉल सेंटर सुविधेचाही आरंभ केला. हेलिकॉप्टर पर्यटन सेवेत एक्झिक्युटिव्ह चार्टर्स, आंतरराज्यीय प्रवास, विमानतळ प्रवास आणि मागणी आधारीत पर्यटन सेवा पुरवण्यात येणार आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.