गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयाच्या रोहन रमेश सावंत व संदेश बाळू येसणे या दोन विद्यार्थ्यांची सैन्य दलामध्ये निवड झाली. ही निवड कोल्हापूर येथे पार पडलेल्या इंडियन आर्मीच्या अग्निवीर भरतीमध्ये करण्यात आली आहे.
या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन लाभले.

