Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावातील कलाप्रेमी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
 महागाव येथील कलाप्रेमी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी मानव अधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाठक होते.

प्रास्ताविक मल्लिकार्जुन मुगळी यांनी केले. मंडळाच्या वतीने उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रा.पं.सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी, अनिता रेडेकर, कोल्हापूर जिल्हा वीज महामंडळ सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झालेले सादिक देसाई, ऑनररी  लेफ्टनंट पदी नियुक्त झालेले दीपक पोटे,आजी-माजी सैनिक संघटनेच्या सचिवपदी निवड झालेले सचिन सावंत यांचा सत्कार करण्यात आला.  

या कार्यक्रमात उपसरपंच संदीप कोकितकर ,दीपक पोटे, हृदयनाथ समशेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवाजी कोकितकर, अनिल हलकर्णीकर,अनिल नाडगोंडे,नारायण कोकितकर,संदेश कोकितकर, अरुण भोसले, अमित कोकितकर,सुशांत कोले,अक्षय काळेबेरे दीपा नाडगोंडे आदी उपस्थित होते. आभार प्रकाश चौगुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.