गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामपंचायत तेरणी, ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशन व युवा परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास अंतर्गत महिला व मुलींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी मेहंदी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण सौ.राजश्री निकम देणार आहेत. दिनांक ६ रोजी ग्रेव्ही प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण सौ.वंदना कातकर देणार आहेत. दिनांक ८ व ९ रोजी २१ प्रकारचे मसाले बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण सौ. वंदना कातकर देणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रम दुपारी १२ ते ४ या वेळेत पार पडणार आहे.
दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप होणार आहे. यावेळी ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा सौ. धन्वंतरी देसाई महिला व बचत गटांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास सरपंच करवीर उथळे, उपसरपंच सौ.दीपा नरेवाडी, सदस्य मोसीम मुल्ला, रमेश पुजेरी, बसवराज बुध, नागराज पाटील, अर्जुन कांबळे, सौ.करिष्मा मुल्ला, सौ.अंजना निंबाळकर, सौ.सोनव्वा कतीगार, श्रीमती अक्काताई हजेरी, सौ. मंजुळा चौगुले, सौ. सुनंदा मलकानावर, ग्रामसेवक एन.ए.कोंडुसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ महिला व मुलींनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

