वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील सामाजिक कार्यकर्ते रमजान अत्तार यांना वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. श्री.अत्तार यांच्या विविध सामाजिक कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले.
रमजान अत्तार यांच्याकडे सध्या दानिविप संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. या माध्यमातून त्यांनी गरीब, निराधार, विधवा परित्यक्ता व घटस्फ़ोटीता यांच्यासाठी काम करत त्यांना आधार देण्याचे काम करत आहेत. त्याबरोबरच संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य पदावर देखील ते कार्यरत आहेत. श्री.अत्तार यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच कॅप्टन आबा पाटील फौडेशन पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रमजान अत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक हारुण सय्यद यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अमर मांगले, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, योगिराज पाटील उपस्थित होते.

