![]() |
गजरगाव: येथे हळदीकुंकू कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित डॉ. देविकाराजे कुपेकर, डॉ.रचना मुसाई, प्रा. डॉ.सुगंधा घरपणकर,अंजना रेडेकर, ज्योती गुरव आदी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयाचे गजरगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले होते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये व्याख्यान, महिला मेळावा व हळदीकुंकू आदी कार्यक्रमांचा समावेश होता.
यावेळी डॉ. वैजनाथ सूर्यवंशी, गडहिंग्लज तालुका शिवसहकार संघटनेचे आखलाकभाई मुजावर यांचे व्याख्यान झाले. महिला मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या महिला मेळाव्यात डॉ. सुगंधा घरपणकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून कुपेकर हॉस्पिटलच्या भूलतज्ज्ञ डॉ.देविकाराजे कुपेकर उपस्थित होत्या.
या सर्व कार्यक्रमाप्रसंगी सरपंच आनंदा कांबळे, माजी सरपंच बाळासाहेब चव्हाण, भागोजी पाटील,आत्माराम पाटील, दयानंद चव्हाण, बापू चव्हाण, भारत दोरुगुडे, मनोहर पाथरवट, भूषण भिंऊगडे, रूपाली पाटील, चंद्रभागा जोंधळे, अंजना रेडेकर, अनुसया कांबळे, सविता पाटील, ज्योती गुरव, कुसुम कुलकर्णी, अक्काताई पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. रचना मुसाई, सूत्रसंचालन प्रा.दिलीप काळे यांनी केले. आभार प्रा. मानाजीराव शिंदे यांनी मानले.



