Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बागवान दांपत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून

महागाव: येथील संत गजानन महाराज हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटप करताना डॉ. यशवंत चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, शब्बीर बागवान.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागावातील शब्बीर बागवान व आयेशा बागवान दांपत्याने आपल्या लग्नाचा 35 वा वाढदिवस  संत गजानन महाराज हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप करून साजरा केला. रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत बागवान दाम्पत्याने साजरा केलेला हा वाढदिवस कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, संस्थेचे सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत फळे वाटप करण्यात आली. यांच्या या विधायक उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी बागवान कुटुंबीयांचे    कौतुक आणि आभार मानले. 

यावेळी बकश  बागवान, महमदहानिफ पठान, रमजान बागवान, महमदनसीम मुजावर, मौसिन बागवान, नूरजहाँ बागवान, आफरिन बागवान, अझरुद्दीन बागवान यासह हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.