![]() |
| गडहिंग्लज : पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांच्या सत्कारप्रसंगी इंजि. एस.आर. कांबळे, प्रा. अप्पासाहेब कमलाकर, प्राचार्य साताप्पा कांबळे, डॉ. ज्ञानराज चिघळीकर, तानाजी कुरळे आदी. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील फुले आंबेडकर विद्वत सभा यांच्यावतीने गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांचा सत्कार करण्यात आला.
फुले आंबेडकर विद्वत्त सभा ही ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी बिगर राजकीय संघटना आहे. या संघटनेमार्फत गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांचा सत्कार झाला. यावेळी फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा समन्वयक इंजि. एस.आर. कांबळे, प्रा. अप्पासाहेब कमलाकर, प्राचार्य साताप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ. ज्ञानराज चिघळीकर, पोलीस पाटील तथा सामाजिक कार्यकर्ते तानाजी कुरळे उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.

