Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'सिद्धगिरी जननी' अपत्यहीन दांपत्यासाठी वरदान ठरेल : नामदार शशिकला जोल्ले


कणेरी मठ (कोल्हापूर):
लग्न झाल्यानंतर बऱ्याच जोडप्यांना मूल न होण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. त्यामुळे एखाद्या सुखी कुटुंबावर हा मोठा आघात ओढवला जातो व हे कुटुंब दुःखी होते. यासाठीच आज आपण कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेने मठावर चालू असलेल्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हे 'टेस्ट ट्यूब बेबी केअर सेंटर' सुरु केले आहे व हे सेंटर अगदी माफक दरात इथे उपलब्ध होणार आहे. बाहेर टेस्ट ट्यूब बेबीसाठी सरासरी अडीच ते तीन लाख रुपये मोजावे लागतात. पण या ठिकाणी अगदी 50 ते 70 हजार रुपयात येथे उपचार होणार आहेत. त्यामुळे  या योजनेचा सर्वसामान्यांच्या बरोबर गरिबांना सुद्धा याचा लाभ होणार आहे.ज्या ज्या वेळी संकटे आली त्या त्यावेळी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला लढल्या, हा इतिहास आहे . त्याच महिलेला अपत्य नसेल तर समाजाकडून हिणवले जाते अशा महिलांसाठी  सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर वरदान ठरेल. असे प्रतिपादन कर्नाटकच्या धर्मादाय व वफ्फ बोर्ड मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले.

कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल येथे सिद्धगिरी जननी  आयव्हीएफ टेस्ट यूट्यूब बेबी सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ना.जोल्ले बोलत होत्या. यावेळी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, बेळगावच्या लोकायुक्त आयपीएस एस.पी. यशोदा एस वंटगोडी, प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली सय्यद, डॉ.वर्षा पाटील उपस्थित होते.

यावेळी पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, एखाद्या महिलेला अपत्य नसेल तर त्या महिलेला हीन वागणूक दिली जाते. तिला दुसऱ्या महिला कोणत्याही कार्यक्रमात पुढे घेत नाहीत. हे सारे एक महिलाच करत असते.त्यामुळे बाळ असणं त्या महिलेसाठी किती महत्त्वाच आहे हे तिलाच माहिती असतं. ती महिला बाळाला जन्म देत नसते तर आईला जन्म देत असते. त्यामुळे मातृत्वाने स्त्री परिपूर्ण होते. मातृत्वाचा हा अनमोलपणा केवळ आणि केवळ स्त्रीला निसर्गाने दिला आहे. याशिवाय आज समाजातील जातीपातीच्या भिंती नष्ट झाल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.असे ते म्हणाले.

यावेळी सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी, आई होणे महिलेसाठी महत्त्वाचे असते . त्याशिवाय तिचं पूर्णत्व होत नाही. प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा अधिकार आहे. सिद्धगिरी जननी या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये स्वामीजींच्या प्रयत्नातून अगदी पन्नास ते सत्तर हजार एवढ्या कमी खर्चात मातृत्वासाठी उपचार घेणे शक्य होणार आहे. या सेंटरची माहिती महिलांच्या पर्यंत पोचवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन.अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविक जननी विभागाच्या प्रमुख डॉ.वर्षा पाटील यांनी केले. यात त्यांनी या हॉस्पिटलमध्ये अगदी माफक दरामध्ये आई होण्याचे भाग्य महिलेला मिळवून देण्याचं काम जोल्ले परिवाराने केले आहे . गरीब महिलांना देखील आई होण्याचं  स्वप्न पूर्ण होईल.या विभागात भारतातील लोकांवर उपचार तर होणारच आहेत पण यापुढे परदेशातील रुग्णांवर ही उपचार करण्यासाठी जननी विभाग प्रयत्नशील राहील व नावलौकिक मिळवेल. भविष्यात हजारो लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी स्वामींजींनी जी संधी दिली, त्याचे नक्कीच सोने करू असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार डॉ. रूपाली चंद्रशेखर यांनी मांनले.

या लोकार्पण सोहळ्यासाठी डॉ. चंद्रशेखर, डॉ. प्रकाश भरमगौडर, डॉ. श्रीकांत कोले, डॉ. सौरभ भिरूड, डॉ. आशिष महामुनी, संस्थांनाचे अध्यक्ष शरद सावंत, प्रताप भोसले, राजन पाठरे, उदय सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी कोल्हापूर व सीमाभागातून सुमारे सात हजारपेक्षा अधिक महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.