Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे

प्रा. पी. डी.पाटील यांचे आवाहन

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात शुभेच्छा समारंभ


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे.भविष्यात आपण कोणत्या क्षेत्रात करियर करणार आहे. हे याच परीक्षेच्या गुणावर ठरणार आहे.शिक्षकांनी वर्षभर भरभरून ज्ञान दिले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा असा सल्ला प्रा. पी.डी. पाटील यांनी दिला आहे.

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात दहावीच्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य आय.एस.पाटील होते.

प्रास्ताविक सुभाष सुतार यांनी केले. यावेळी वर्षा तिळवले, प्रांजली पाटील, सोनल पाटील, ओमकार वाघराळकर, जोतिबा रेडेकर, अनिल पोवार, समर्थ पाटील यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर भिमराव भुईबर ,प्रकाश चौगुले,अशोक नांदुलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले. आभार एकता पाटील यांनी मानले. यावेळी अनिल हलकर्णीकर, संदेश कोकितकर, दयानंद सुतार, कुलदीप देसाई, रमेश कळविकट्टे, शिवाजी सुतार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.