Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माणुसकीची पुजा करणारे सामाजिक कार्यकर्ते : माजी सैनिक मारुती पाटील


बेळगाव:
मंजिलें उन्ही को मिलते हैं जिनके सपनो में जान होती है, पंखों से कुछ नही होता, दोस्तो हौसलों से उडान होती हैं।  हे ब्रीदवाक्य आत्मसात करून कृतीत आणलं ते सीमा भागातील माजी सैनिक मारुती पाटील यांनी.

भक्ती मार्गातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ मुक्तिमठाच्या पायथ्याशी असलेल्या घुग्रेनटी येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन सैन्यात भरती होऊन १७ वर्षे देशसेवा करून सेवानिवृत झाले. यांचा सैनिक सेवेतील प्रवास तरुणांना प्रेरणादायी आहे. गावात घर नाही , शिवारात केवळ अर्धा एकर शेती, उपजिविकेसाठी दुसऱ्याची केलेली शेती अशा अवस्थेत कित्येक वर्षे गावाजवळील एका सावकाराच्या चिक्कूच्या बागेत कुडाच्या घरातच 'पाटील ' कुटुंबाचा जीवन प्रवास सुरु होता. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मणगुत्ती (ता.हुक्केरी ) येथे झाले. त्यांचा शालेय जीवनातील प्रवास अत्यंत खडतर होता. वडील गवंडी काम करत असल्यामुळें दिवसभर सेंट्रिंगची कामे करून संध्याकाळ व्यायाम, अभ्यास करून आई- वडिलांना कामात मदत अशी त्यांची दिनचर्या होती.               

पोटभर जेवण मिळत नव्हते. स्मशानभूमीतील रक्षाविसर्जनचा नैवेद्य खाऊन ते आपले पोट भरत. अशा अठराविश्वे दारिद्रयात जीवन जगून २६ सप्टेंबर २००५ मध्ये वेलिंग्टन तमिळनाडू येथे भारतीय सैन्य दलात भरती झाले. प्रशिक्षणानंतर सिकन्दराबाद येथून नोकरीला सुरुवात झाली. नागालँड, आसाम, मणिपूर, गुवाहाटी, मेघालय, मधुकरै, जामनगर, कोल्हापूर, अरुणाचल प्रदेश, कोलकत्ता व वेलिंग्टन आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली.

घुग्रेनटी : 'स्वप्न साकार' या निवासस्थानी बारा फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभारणीसाठी रंगरंगोटीसह तयार केलेला चबुतरा. दुसऱ्या छायाचित्रात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा.

घरची परिस्थिती बेताची असल्याने कर्जाचे हप्ते फेडून त्यानंतर दोन बहिणींच्या विवाहाची जबाबदारी पार पाडली. त्यातच वडीलांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सर्व जबाबदारी मारुती पाटील यांच्यावर पडली.

गावात दुमजली 'स्वप्न साकार' या मारुती पाटील यांच्या निवासस्थानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार सतीश जारकिहोळी, युवा नेते राहुल जारकिहोळी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१८ रोजी होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.