Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज इंग्लिश मेडीयम विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने रसिक-श्रोते मंत्रमुग्ध

                                     (सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
येथील शिवराज इंग्लिश मेडीयमच्या स्नेहसंमेलनामध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या बहारदार गाणी व नृत्याचा जलवा सादर करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थी आणि पालकांच्या कलागुणांना व्यासपीठ प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यार्थी आणि  पालक यांनी रिमिक्स गाण्यावर सादर केलेल्या जबरदस्त नृत्याच्या नजाकतीला रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

विद्यार्थ्यांनी नव्या- जुन्या  सादर केलेल्या गीतांच्या मैफिलीने कार्यक्रमाची रंगत वाढली. छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगणारी गाणी आणि कोळी नृत्य, शेतकरी नृत्य लावणी, कॉकटेल, डिस्को यासह रिमिक्स तालावरील नृत्यांवर ताल धरून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यावेळी मोबाईलमुळे लगोरी, विटी- दांडू, गोटया यासह अनेक मैदानी खेळांचे महत्त्व विसरू पाहणाऱ्या नव्या पिढीला त्याचे महत्त्व कळावे यासाठी मैदानी खेळाचा नजराना नृत्यांमधून दाखवून आपल्या मैदानी परंपरा अधोरेखित करण्यात आली. फुटबॉल परंपरेची महती स्पष्ट करणारे फुटबॉल म्युझिक थीम नृत्य  सादर करण्यात आले.

प्रारंभी शिवराज इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे यांनी स्वागत करून प्रास्ताविकामधून स्कूलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन अभिनेता अमोल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव डॉ. अनिल कुराडे, शिवराजचे पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, अभिजीत मेटल्सचे श्री. हजारे अण्णा, रेखा पोतदार, तानाजी कुराडे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेता अमोल देसाई, सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन फारूक ठगरी, शरद कांबळे, प्रा. बियामा वाटंगी, कु.अमरीन मुल्ला यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, पालक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.