Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एन.सी.सी बेस्ट कॅडेट सुकन्या रणदिवे, कुस्तीपटू रोहन रंडे यांच्या सन्मानार्थ गडहिंग्लजला जल्लोषी मिरवणूक

                                        (सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन पथसंचलानामध्ये महाराष्ट्रला चॅपियनशिप मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारी शिवराज महाविद्यालयाची ५६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.ची सिनिअर अंडर ऑफिसर कु. सुकन्या सुबराव रणदिवे या कॅडेटचा सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार व ट्रॉफी देऊन करण्यात आला. तसेच कुस्तीमध्ये राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालयाचा कुस्तीपटू रोहन रंडे या दोन्ही विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ गडहिंग्लज शहरातून वाजत-गाजत भव्य जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीची सुरुवात शिवराज महाविद्यालयातून करण्यात आली. ही मिरवणूक शहरातील बाजारपेठ व शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे आली. यावेळी शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सुकन्या रणदिवे व कुस्तीपटू रोहन रंडे यांचा सत्कार शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गडहिंग्लज तालुक्‍यातील आजी-माजी संघटनेच्यावतीने या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वीर मराठा सैनिक वेल्फेअर संघटना नेसरी यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या भाषणातून नरेवाडीची 'सुकन्या' ने दिल्लीच्या पथसंचलनातून महाराष्ट्राचे नेतृत्व करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिवाय कुस्तीपटू रोहनने कुस्तीमध्ये मिळविलेले यश हे आम्हा सर्वांना अभिमानास्पद असल्याचे स्पष्ट केले. सैनिक वेल्फेअर संघटनेचे रवींद्र मंडलिक यांनी बेस्ट कॅडेट म्हणून सुकन्याने दिल्ली परेडमध्ये अव्वल यश मिळवून गडहिंग्लजचे नाव देशात चमकविले आहे हे सर्वांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

खुल्या जीपमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सुकन्या रणदिवेचे आई-वडील, बेस्ट कॅडेट सुकन्या, कुस्तीपटू रोहन रंडे उपस्थित होते.

                                (सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार)

या मिरवणुकीमध्ये गडहिंग्लज तालुक्‍यातील आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी कुमार पाटील, श्री.हळदकर, सेनामेडल सुभाष इंगळे, जयसिंग येसादे, सुभाष सावंत, अजित पाटील, शशिकांत जाधव यांच्यासह तालुक्‍यातील विविध गावचे सैनिक संघटना पदाधिकारी, संस्थेचे संचालक बसवराज आजरी, क्रीडा शिक्षक डॉ.राहूल मगदूम, प्रा.जयवंत पाटील, प्रा. विश्वजीत कुराडे, साधना हायस्कूलचे विनायक नाईक तसेच साधना, गडहिंग्लज हायस्कूल व शिवराज महाविद्यालयाचे एन.सी.सी.कॅडेट व संभाजीराव माने ज्युनिअरचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले व डॉ. श्रद्धा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.