कोल्हापूर: कणेरी मठ येथे दगावलेल्या गाईंच्या मृत्यूचे वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकाराला मारहाण झाल्याची घटना घडल्याने पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. पत्रकारांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कणेरी मठ येथे गेल्या चार दिवसापासून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा सुरू आहे. हा जागतिक कीर्तीचा सोहळा असल्याने विविध मान्यवरांसह लोकांची मोठ्या प्रमाणात मठावर दररोज गर्दी होत आहे. दरम्यान, मठातील गो शाळेत अचानक ५० हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकाराला धक्काबुक्की करत मारहाण झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.


