Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन हॉस्पिटल समोरील रस्ता कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

आमदार राजेश पाटील यांना डॉ. यशवंत चव्हाण यांचे निवेदन 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल समोरील रस्ता खडीकरण व डांबरीकरण तसेच गटार बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी डॉ.यशवंत चव्हाण यांनी आमदार राजेश पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे. विविध विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार पाटील महागाव दौऱ्यावर होते यावेळी सदर निवेदन देण्यात आले. यावेळी संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे संस्थापक चेअरमन ॲड.अण्णासाहेब चव्हाण उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल हे गडहिंग्लज, आजरा, चंदगड व सीमा भागातील गरीब, गरजू लोकांना अत्यल्प दरात सेवा देणारे ट्रस्ट हॉस्पिटल आहे. सदर हॉस्पिटल समोरील रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येणारे- जाणारे सर्व रुग्ण, नातेवाईक व गावातील लोकांना त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच दोन्ही बाजूच्या गटार बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, संस्था सचिव बाळासाहेब चव्हाण, शिवाजीराव माने यांच्यासह इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.