चंदगड (प्रतिनिधी): बाळासाहेबांची शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या चंदगड उपतालुकाप्रमुख प्रमुखपदी कामेवाडी-- नरगट्टे येथील शिवाजी मारूती नाईक यांची निवड करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना चंदगड तालुका प्रमुख कल्लाप्पान्ना निवगीरे यांनी सदर नियुक्ती पत्र दिले. तडशिनहाळ फाटा येथील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी उपतालुकाप्रमुख प्रमुख दत्ता पाटील, ओबीसी सेलचे तालुका प्रमुख मारूती पाथरूट, युवा सेना तालुका प्रमुख तुकाराम पाटील, तुलशिदास जोशी, मनोहर पाटील, दिवाकर पाटील, मिथुन पाटील, नागेश नौकुडकर, संरोळी गावचे शाखा प्रमुख केदारी निवगीरे, रघुनाथ पाटील व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजी नाईक म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करून पक्ष बांधणीसाठी चांगले काम करत राहिन.

