गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील व्यापारी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय मिरजकर व व्हा. चेअरमनपदी बाबासाहेब कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहा.निबंधक एफ. डी. जमादार यांनी काम पाहिले.
नूतन चेअरमन मिरजकर यांच्यासाठी सुचक विजय आरभावी व अनुमोदक विजयालक्ष्मी मगदूम तर नूतन व्हा.चेअरमन कांबळे यांच्यासाठी सुचक माधव पोटे- पाटील व अनुमोदक सुनील पट्टणशेट्टी होते. यावेळी संचालक रवींद्र धरणगुत्ती, सुनील खटावकर, विश्वास कलाल, शीलाताई कांबळे व जनरल मॅनेजर दशरथ पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. आभार माजी चेअरमन सुनील खटावकर यांनी मानले.

