गडहिग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कला व वाणिज्य महाविद्यालय नेसरीचे प्रा.डॉ. डी.के.कांबळे होते.
प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. या मेळाव्यामध्ये डिसेंबर २०२२ या परीक्षेमध्ये सी.ए.,सी.एम.ए.,सी.एस.फाउंडेशन, सी.ए. इंटर परीक्षेत यश मिळविलेल्या सेबेस्टीना बारदेस्कर, प्राजक्ता कांबळे, सिद्धी गिलबिले, शुभम पाथरवट, निखील मुळे, मानसी गुरव, प्राप्ती देसाई, साक्षी चौगुले, रेवती चौगुले, सृजन कुलकर्णी, ज्योती सावंत, स्वीटी बारदेस्कर, पल्लवी राजगोळकर, सुप्रिया पाटील, प्राजक्ता चोथे, अंकिता चोथे, साक्षी देसाई, साक्षी कुलकर्णी, सुमित चव्हाण, अवधूत यादव, सुशांत पाटील, सुमित पाटील, मीनल बारदेस्कर, समृद्धी गेंगे या २४ विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच करंबळी ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा.तेजस्विनी पाटील यांचा सत्कार संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी केला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.डी.के.कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मध्ये झोकून दिले पाहिजे. विद्यार्थ्याच्या करिअरला शिक्षक घडवीत असतोच परंतु पालकांचा रोलही महत्वाचा आहे. यासाठी शिक्षक व पालक तसेच विद्यार्थी यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे सांगितले.
संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनात शिवराजचे बहुसंख्य विद्यार्थी यां नामांकित परीक्षेत उत्तीर्ण होणे हे आम्हाला भूषणावह आहे. त्यामुळे शिवराजमध्ये लवकरच स्वतंत्र वाणिज्य महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालक गणपत पाथरवट, अजित वंटमुरे, प्रा.नाझीया बोजगर, प्रा.तेजस्विनी पाटील, विद्यार्थिनी साक्षी देसाई, मानसी गुरव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रा.बियामा वाटंगी यांनी मानले. इंग्लिश विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.महेश चौगुले यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.




