गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने गडहिंग्लज उपविभागीय क्रिकेट स्पर्धेत महागाव मेडिकल असोसिएशनने तृतीय क्रमांक पटकावला.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यातील बारा संघांचा सहभाग होता. या संघात डॉक्टर्स, एम आर व लॅब टेक्निशियन यांचा समावेश होता. या स्पर्धेत महागाव मेडिकल असोसिएशन तृतीय क्रमांक पटकावून विभागात डंका निर्माण केला. या स्पर्धा शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या.
या क्रिकेट स्पर्धेत मालिकावीर डॉ.विनोद पन्हाळकर यांना तर सामनावीर डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. विलास रेडेकर यांना सन्मानित करण्यात आले. या संघात कर्णधार डॉ.शशिकांत जाधव, डॉ. विलास रेडेकर, डॉ. विनोद पन्हाळकर, डॉ.राजेश मुसंडी, डॉ.प्रवीण शिंदे, डॉ.अंकुश शिंदे, डॉ.अनिल यादव, डॉ.मकरंद देसाई, डॉ.अशोक पाटील, डॉ. नितीन पोटजाळे, डॉ. अमृत इंजल, डॉ. सचिन पोटे, डॉ. सुधाकर पाटील यांचा समावेश होता.
या संघाला डॉ. निळपणकर, डॉ.आर. डी. पाटील, डॉ.विश्वजीत शिंदे, डॉ. शहा यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक केदारी रेडकर मेडिकल कॉलेज,गडहिंग्लज ,द्वितीय क्रमांक भुदरगड मेडिकलअसोसिएशन,भुदरगड यांनी पटकावला.


