Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारत ठरला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश

जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्के योगदान 


नवी दिल्ली :
अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस (एफएओएसटीएटी) मधील उत्पादनविषयक माहितीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे.

वर्ष 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्केचे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2014-15 ते 2021-22 अशा गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून  2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन बावीस कोटी टनांपर्यंत वाढले आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन तसेच दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.