कोल्हापूर : अंगणवाडी सेवकांच्या विविध मागण्या रास्त असून राज्य सरकारने या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करणेे गरजेचे आहे. याबाबत आपण येत्या अधिवेशनात अंगणवाडी सेविकांच्या या मागण्या मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी दिले.
यावेळी झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविकांची मते आमदार ऋतुराज पाटील यांनी ऐकून घेतली. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या रास्त असून आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून येत्या अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याचा विश्र्वास अंगणवाडी सेविकांना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला.
यावेळी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे, अंगणवाडी सेविकांच्या वतीने संगीता पोवार, यशोमती यमगेकर, उषा कडोलकर, सारिका पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या उपाध्यक्ष जुलेखा मुल्लाणी, सचिव सुवर्णा तळेकर, सहसचिव लता कदम, छाया तिप्पट, आक्काताई उदगावे, बिस्मिल्ला शिकलगार, प्रियांका पाटील, कल्पना पिलारी आदींसह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



