Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार

सत्कारमूर्तींमध्ये सौ.क्रांतीदेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, डॉ.सरोज बिडकर, पार्वती पाटील, अनिता घुगरे, नम्रता पोवार यांचा समावेश 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराजमध्ये जिजाऊ ब्रिगेडचा आदर्श माता पुरस्कार प्राप्त गोडसाखरच्या माजी संचालिका क्रांतीदेवी कुराडे, दिल्ली येथे रिसर्च विंग ऑफ एक्सलन्स इन प्रोफेशनल एज्युकेशन अँड इंडस्ट्री यांच्यावतीने '८ व्या दक्षिण आशिया एज्युकेशन ॲवॉर्ड २३ मध्ये 'बेस्ट प्राचार्य ॲवॉर्ड ' विजेते प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ.सरोज बिडकर, पार्वती पाटील, अनिता घुगरे, नम्रता पोवार आदींचाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव के.व्ही. पेडणेकर तर प्रमुख अतिथी म्हणून गोकुळ दुध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर उपस्थित होत्या.

स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोकुळ दुध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर व सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी मार्गदर्शन करून पुरस्कार प्राप्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. या कार्यक्रमात माजी संचालिका क्रांतीदेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, डॉ.सरोज बिडकर,नम्रता पोवार यांनी आपल्या भाषणातून आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सहसचिव के. व्ही. पेडणेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मागदर्शन करून पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमात जिजाऊ महिला ब्रिगेड व सखी मंडळाच्या वतीनेही सर्वांचा सत्कार करण्यात आला. विभागीय अध्यक्षा सुवर्णलता गोविलकर, सखी महिला मंडळाच्या अरुणाताई शिंदे, उज्वलाताई दळवी, छाया इंगळे, गीता पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.सौ.पौर्णिमा कुराडे, शिवराज इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा.स्वप्नील आर्दाळकर, प्रा.तानाजी भांदुगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.आशा पाटील यांनी मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.