विद्यार्थी व पालकांनी चांदणी भोजनाचाही घेतला आस्वाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): जीवन शिक्षण विद्यामंदिर हसूरसासगिरी (ता.गडहिंग्लज) येथे मुंगूरवाडी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम.डी. यल्लूरकर यांनी विद्यार्थ्यांना आकाश दर्शन घडवून आणले.
यावेळी माजी मुख्याध्यापक यल्लूरकर यांनी अतिशय सुंदर व अनमोल अशी अवकाशातील तारे, ग्रह व चांदण्यांची अद्भुत माहिती विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक व पालकांना उलगडून सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यामंदिर नौकुडच्या टेलिस्कोपमधून चंद्राचे जवळून दर्शन घडवले. त्यानंतर विद्यार्थी व पालकांनी चांदणी भोजनाचा आस्वाद घेतला.
विद्यामंदिर हसुरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पावती दरेकर, जयवंत दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.पुजा पोवार, उपाध्यक्ष राम कुंभार, नरेंद्र सुतार, विजय जाधव, संजय नलवडे, मारुती कडूकर, श्रीकांत जाधव, राजेंद्र पोवार, अंगणवाडी सेविका सौ.शोभा जाधव, आनंदराव जाधव, सौ.सुनिता जाधव यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत कल्लोळे यांनी केले. आभार सुनिल सुरंगे यांनी मानले.





