Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात; घटना अतिशय दुर्दैवी

कणेरी श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचा खुलासा


कोल्हापूर:
श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सावा दरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही जीवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे. असा खुलासा श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने केला आहे.

कणेरी मठाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे. भाकड व भटक्या गाईना कोणी वाली नाही अशी जनावरे कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालन पोषण केले जाते. त्यामुळे ही  गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठी ही नुकतीच निवारा व सेवा शाळा सुरु करण्यात आलेली आहे. 

पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावारावरील निष्टा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाही घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात हाच या महोत्सवाचा हेतू आहे. 

अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानांतून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईलच. कृपया झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेवू नये इतकीच विनंती आहे. 

मठाने नेहमी पत्रकार बांधवांचा सन्मान केला आहे, तसेच पत्रकार बांधवांनीही नेहमी मठाच्या विविध सामाजिक उपक्रमात आपले बहुमुल्य योगदान दिले आहे व नेहमीच अमुल्य सहकार्य केलेले आहे व करत आहेत. कोणी खोडसाळपणे पत्रकार बांधवांच्या बाबतीत गैरप्रकार केला त्याबद्दल आम्ही व्यवस्थापनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत. असे खुलाशात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.