Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'पीएम किसान'चा 13 वा हप्ता सोमवारी बेळगावमधून पंतप्रधान मोदी करणार शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित

पंतप्रधान 27 तारखेला बेळगाव दौऱ्यावर

बेळगाव येथे 2,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकसित इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  सकाळी 11:45 च्या सुमारास मोदी शिवमोग्गा विमानतळाची पाहणी करतील. त्यानंतर, ते शिवमोगा इथल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उदघाटन करतील. त्यानंतर दुपारी सुमारे सव्वातीन वाजता बेळगाव इथे पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करतील. तसेच पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची रक्कमही त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

शेतकर्‍यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत, 13 व्या हप्त्याची अंदाजे 16,000 कोटी रुपये रक्कम, 8 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरीत केली जाईल. या योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी वर्षाला एकूण 6000 रुपये, 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.