गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प 2023- 24 व शेती या विषयावर गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी प्रा.एन.आर.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा .डॉ.वैजनाथ सूर्यवंशी उपस्थित होते.
या गटचर्चेमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शेतीसाठी केलेल्या तरतुदी, शाश्वत शेतीसाठी, शेतकरी उत्पादक कंपनीसाठी केलेल्या तरतुदी, शेतीसाठी निर्धारित केलेली एकूण रक्कम, शेतीचे वास्तविक दर्शन, शेतीचा विकासदर, शेती आणि सिंचन, शेती आणि संशोधन या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
यातून विद्यार्थ्यांमध्ये अर्थसंकल्पातील विविध विषयांवर ज्ञान वृद्धिगत होण्यास मदत झाली. या गटचर्चेचे आयोजन अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ. केशव देशमुख यांनी केले. यासाठी प्राचार्य डॉ.निवास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्था अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा मिळाली.

