गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी येथील बी.एम टोणपी प्रशालेत बसर्गे व हलकर्णी येथील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगिता संगाज होत्या.
यावेळी माजी जि.प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, बसर्गेच्या सरपंच भारती रायमाने, बी.एस टोणपी, अध्यक्ष अप्पासाहेब टोणपी, सुनील भुईंबर, अमानुल्ला मालदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास प्रवीण जिनानावर, ज्ञानदेव यादव, पुरुषोतम शिंदे, गजानन हसूरकर, चंद्रकांत सुतार, अझर कादरभाई, भीमराव रवेदार, संजय यलायगोळ, संतोष चिरमुरे, अनुजा भुईंबर, राजश्री व्हसकोटी, शिल्पा पाटील, रोहित चीकबसर्गे, अशोक लवटे, शीतल व्हनोळी, पी.एम.पाडवी, दिपाली शिंदे, लावण्या मनगुत्ते, अतुल पाटील यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव अर्चना टोणपी यांनी उपस्थितांचे आभार मानले. मुख्यध्यापक पी.एच.वाके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले


