Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'सुमंगलम् लोकोत्सव'मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरची विधायक ओळख निर्माण होईल

अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांचा विश्वास 

शिवजंयती दिनी भव्य शोभायात्रा, पंचगंगा नदीवर महाआरती


कणेरी मठ: 
कणेरीमठ येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेला 'सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव 'आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्याची एक वेगळी विधायक आणि व्यापक ओळख निर्माण होईल असा विश्वास परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला.                                      

या लोकोत्सवात आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या प्रांरभापासून आजपर्यंतची प्रवास रचना, मानवाच्या अतिरेकी वापरामुळे झालेली दुरावस्था आणि आगामी काळातील धोके व घ्यावयाची दक्षता या संदर्भात प्रबोधनपर असे हे पाच ड्रोम सर्वांसाठी महत्त्वाचे आणि ज्ञानात भर घालणारे असे ठरणार आहेत. यासह शंभर टक्के स्वयंपूर्ण बनवणारी शाळा म्हणजे अनोखे गुरुकुल विद्यालय कणेरी मठावर सुरु आहे. ‘पंचमहाभूत लोकोत्सव’मध्ये याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरु आहे. एका मूर्तीची किमत ४० ते ५० हजार रूपयांच्या घरात असून ऊन, पाऊस झेलत शेकडो वर्षे या मूर्ती टिकून राहतील असा विश्वास मठाच्या प्रशासनाला आहे. सहाशेच्यावर मुर्त्या बनवण्याचे काम काम अंतिम टप्प्यात आहे.

सिद्धगिरी कणेरी मठावर सुरु असणाऱ्या अनोखे गुरुकुल विद्यालयामध्ये चार वेद, सहा शास्त्र आणि ६४ प्रकारच्या कला शिकविल्या जातात. ब्रिटिश प्रभावी मेकॉले शिक्षणपध्दतीने परस्पर संवाद नाहीसा झाला आहे. कुटुंबव्यवस्था व सामाजिक जीवन उद्धवस्त होत आहे आणि केवळ चाकरमाने निर्माण झाले. शंभरातील केवळ तीन ते पाच जणांनाच नोकऱ्या  मिळतात. त्यावर हा एक कृतीशील प्रभावी पर्याय आहे . गोपालक, एक हजार वर्ष टिकणारे घर बनवणारा इंजिनिअर, प्रक्रिया उद्योजक, व्यावसायिक, शिल्पकार, ज्वेलर, संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतीषशास्त्र (खगोलशास्त्र), हवामानशास्त्र, हॉर्स व बुल रायडींग, इतिहास, पाठांतर (आयुर्वेदाचे श्लोक), शिल्पवेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, युध्दकला, मॅनेजमेंट, नॅचरल सायन्स, वेदगणित, ब्युटीपार्लर अशा असंख्य कला शिकवल्या जातात. हे सर्व शिकवताना संस्कृत, मातृभाषा, आश्रमभाषा, राष्ट्रभाषा आणि शेवटी इंग्रजी भाषेला महत्व दिले जाते. 

रोटरी क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून त्यांच्या विविध ठिकाणच्या आजी- माजी, भावी गव्हर्नर तसेच विविध पदाधिकारी यांना संपर्क साधला जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, दिल्लीसह चारही महानगर अर्थात मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर इथूनही पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

भव्य शोभायात्रा आणि महाआरती होणार 

लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवजयंती दिनी  कोल्हापूर शहरामध्ये भव्य शोभायात्रा आणि जिल्ह्याची मुख्य नदी असलेल्या पंचगंगा नदीवर सायंकाळी महाआरती असा सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळ तसेच शहरातील तालीम संस्था, महिला बचत गट आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन आपल्या कला सादर करणार आहेत.


   'ग्लोबल टू लोकल'.....

स्थानिक ते वैश्विक सहभाग या खऱ्या अर्थाने लोकोत्सव  सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये सध्या कणेरी मठ परिसरात पंचक्रोशीतील विविध संस्था तरुण मंडळी, महिला बचत गट उस्फूर्तपणे येऊन श्रमदान करीत आहेत. या स्थानिक सहभागासह देश-विदेशातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व संशोधन संस्था याही कार्यरत आहेत. अशा तऱ्हेने हा 'ग्लोबल टू लोकल' असा लोकोत्सव सोहळा होणार आहे. यामुळे कोल्हापूर व महाराष्ट्राची एक वेगळी विधायक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होईल. त्यासाठी सर्वांनी आपले यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.