Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावात महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन

परिसरातील रुग्णांनी घेतला लाभ

महागाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिराचे उदघाटन करताना सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकितकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शासनाच्या संकल्प निरोगी अभियाना अंतर्गत महागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरातील १०७  रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराचे उदघाटन सरपंच प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्ना चौगुले यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकातून महाआरोग्य शिबिराचा हेतू व महत्त्व सांगितले. गरोदर मातांचा आहार, औषधे, वेगवेगळे डोस व गरोदरपणात घ्यावयाची काळजी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.

या शिबिरात संत गजानन रुरल हॉस्पिटलचे डॉ. अर्चना उगळे, डॉ.सुजाता टेंबुगडे, निखिल एडगे, विक्रम सोमवंशी आदी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधे दिली. 

यावेळी उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य हृदयनाथ सोमशेट्टी, विकास इंगवले, अक्तर बागवान, वैशाली पाटील, समीना बागवान यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. विजयमाला होडगे यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.