Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अनिल कलकुटकी यांना 'बरच काही फौंडेशन' चा समाजरत्न पुरस्कार जाहीर


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवराज महाविद्यालय येथील ग्रंथालय कर्मचारी अनिल लक्ष्मण कलकुटकी यांना कोल्हापूर येथील 'बरच काही फौंडेशन' यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या समाजरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

हा पुरस्कार सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.५ मार्च रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. श्री.कलकुटकी यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर आदींचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या पुरस्काराबद्दल श्री. कलकुटकी यांचे कौतुक होत असून विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.