Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन 'फार्मसीत नवागतांचे स्वागत


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रथम वर्षे विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ उमंग - 2023 हा उत्साहात झाला. प्रमुख पाहूणे म्हणून आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे या उपस्थितीत होत्या. 

स्वागत प्राचार्य डॉ.एस. जी. किल्लेदार यांनी केले द्वितीय वर्षे विद्यार्थ्यांनी नवगताचे स्वागत पुष्प देऊन केले. दरम्यान, प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी नृत्य, गायन व मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी  मिस फ्रेशर म्हणून साक्षी धावडे व मिस्टर फ्रेशर श्री ज़िमुर याची निवड करण्यात आली. यावेळी शिक्षक,विद्यार्थी व पालकांची  उपस्थिती होती. आभार प्रा. कैवल्य मिरजकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.