गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या श्रध्दा बनसोडे हिने वैराग (सोलापूर ) येथे झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. बनसोडे हिने 'रिलीव्हन्स ऑफ चरक संहिता इन मॉडर्न टाईम्स' या विषयावर निबंध सादर केला होता.
या स्पर्धेत तिने तीस पैकी वीस रिवॉर्ड पॉइंट्स घेउन द्वितीय क्रमांक मिळवला. तिला मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देवून गौरवण्यात आला. या स्पर्धेत २२ आयुर्वेद महाविद्यालयातील १२१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या यशाबद्दल संस्थापक ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन तर प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे प्रा. डॉ. विनायक गरुड, प्रा.डॉ. दिग्विजय पाटील, प्रा. डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

