गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालय येथील ग्रंथालय कर्मचारी श्री अनिल लक्ष्मण कलकुटकी यांना कोल्हापूर येथील "बरच काही फौंडेशन" यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या समाजरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार सोहळा दि.5 मार्च रोजी शाहू स्मारक कोल्हापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बरच काही फौंडेशनचे अध्यक्ष संदीप संकपाळ, उपाध्यक्ष सौ अश्विनी संकपाळ, सचिव श्रीपाल कांबळे, कॉम्रेड शिवाजी गुरव, ग्रामपंचायत सदस्य किर्ती मसुटे यांच्यासह फौंडेशनचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


