गडहिंग्लज (प्रतिनिधी): "बरच काही फौंडेशन", कोल्हापूर यांच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल चन्नेकुप्पीचे पोलीस पाटील तानाजी रामचंद्र कुरळे यांना समाजरत्न पुरस्कार - २०२३ ने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, चांदीचे नाणे असलेली प्रतिमा फेम आणि "भारतीय संविधान का वाचावे...?" हे लेखक डॉ. श्रीपाद श्रीधर देसाई यांचे पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कार वितरण समारंभास "बरच काही फौंडेशन"चे अध्यक्ष संदीप संकपाळ, सौ. अश्विनी संकपाळ, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, किर्ती मसुटे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, सचिव श्रीपाल कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


