Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ओंकार महाविद्यालयात ऐतिहासिक संदर्भ साधनांवर कार्यशाळा


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
ओंकार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गडहिंग्लज येथे अग्रणी शिवराज महाविद्यालय योजनेअंतर्गत 'समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधने निर्मिती व जतन' या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे संचालक उद्धवराव इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात समकालीन 'ऐतिहासिक संदर्भ साधनांची निर्मिती' या विषयावर डी. आर. माने महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष जेठीथोर यांनी इतिहासाचे लेखन करत असताना समकालीन साधनांना महत्त्वाचे स्थान असते. इतिहासाचे लेखन हे इतिहासकारांच्या दृष्टिकोनावर देखील अवलंबून असते. यासंदर्भातील अनेक दाखले दिले. द्वितीय सत्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. ज्योती व्हटकर यांनी “समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचे जतन' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी इतिहासाची जी साधने आहेत त्यांचे जतन करणे फार महत्त्वाचे आहे. इतिहासाचे लेखन करत असताना कागदपत्रांचे जतन करून ठेवल्यामुळेच इतिहास लेखन करणे सुलभ झाले आहे. अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागला असता असे मत व्यक्‍त केले.

कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक तथा अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी देखील इतिहासाचे लेखन करत असताना समकालीन साधनांना महत्त्वाचे स्थान आहे तसेच साधानांची व्यवस्थितपणे छाननी करून लेखन करणे महत्त्वाचे आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांची प्रेरणा लाभली.

प्रास्ताविक प्रा. धर्मवीर क्षीरसागर, स्वागत व परिचय प्रा.डॉ. काशिनाथ तनंगे, सूत्रसंचालन प्रा. क्रांती शिवणे यांनी केले. आभार प्रा.डॉ. शर्मिला घाटगे यांनी मानले. यावेळी इतिहास विभागातील प्रा. प्रशांत कांबळे यांच्यासह अग्रणी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.