डॉ.महेश चौगुले, प्रा.रोशन पाटील, उत्तम राऊत, प्रा.विक्रम शिंदे, समाजरत्न पुरस्कार प्राप्त अनिल कलकुटकी तसेच राजू जाधव आदींचा सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर वि.रा.शिंदे शिक्षण संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे होते. तर प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
येथील शिवराज विद्या संकुलामध्ये शिव-शाहू सेवकांची सहकारी गडहिंग्लज संचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉ.महेश चौगुले, प्रा.रोशन पाटील, श्री उत्तम राऊत, श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मुगळी (ता.गडहिंग्लज) संचालकपदी निवडीबद्दल प्रा.विक्रम शिंदे व शिवशाहू सेवकांची पतसंस्था बिनविरोध निवडीसाठी महत्वाची भूमिका बजाविण्यासाठी महाविद्यालयातून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल कार्यालयीन क्लार्क राजू जाधव तसेच 'बरच काही फौंडेशन' कोल्हापूर यांच्यावतीने समाजरत्न पुरस्कार प्राप्त ग्रंथालय कर्मचारी अनिल कलकुटकी आदींचा सत्कार कर्मवीर वि.रा.शिंदे शिक्षण संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, ग्रंथपाल संदीप कुराडे यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा.अशोक मोरमारे यांनी केले. या कार्यक्रमात संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी शिवराज महाविद्यालय हे समाजातील विविध क्षेत्रात आपल्या परीने योगदान देत आहे हे आम्हाला अभिमानास्पद आहे. शिवराजच्या माध्यमातून जे-जे समाजासाठी करता येईल ते योगदान देण्यासाठी आपण तत्पर राहूया शिवाय महाविद्यालयाच्या प्राध्यापक व सेवक वर्गाने आपल्या कार्यातून समाजाशी ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे असे स्पष्ट करून सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी ही शिवराज महाविद्यालयाची यशस्वीतेची घोडदौड चालू आहे. या महाविद्यालयातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने जी सामाजिकता जपली पाहिजे. त्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगून सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्तीं डॉ.महेश चौगुले, प्रा.विक्रम शिंदे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास नॅकचे समन्वयक प्रा.किशोर अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, शिवराज इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे यांच्यासह शिवराज विद्या संकुलातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार विना-अनुदानित विभागाचे समन्वयक प्रा.आझाद पटेल यांनी मानले.







