Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महिला दिन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महिला दिन संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक प्रा.निर्मला-शेबाळे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राहुल जाधव होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ.राहुल जाधव यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय प्रा.स्नेहल दळवी यांनी करून दिला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक प्रा.निर्मला शेवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये- आज मुलींच्या जन्मांचे स्वागत होत आहे. हे आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहे. समाजात मुले-मुली असा भेदभाव गळून पडला आहे. मुलींनी आपली वाटचाल सक्षमतेच्या दृष्टीने करणे आवश्यक आहे. स्त्री, आई-वडील, भाऊ, पती व अन्य कुटुंबियांच्या साथीने समाजासाठी बहुमोल योगदान देत असते. त्यांच्या योगदानाला वेळीच पाठबळ देण्याच्या प्रयत्न होणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांनी आपण कसे घडलो आपल्या जडणघडणीमध्ये घडलेल्या जीवनातील संघर्ष त्यांनी व्यक्त केला. तसेच आपल्या निवडक कविता सादर केल्या.

यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात फार्मसीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कर्तृत्वान महिलांच्या शौर्यगाथेने कार्यक्रमामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्राचार्य डॉ.राहुल जाधव यांनी आज सर्वांना स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा योग्य असा वापर होणे आवश्यक आहे. मुलींनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये असे प्रतिपादन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अनघा पाटील, प्रा.गौरी पोवार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास फार्मसीचे प्रा. ऋतुजा सावेकर, प्रा.स्नेहल दळवी, इतर मान्यवर, प्रशासकीय सेवक, विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैष्णवी पाडले यांनी केले तर आभार प्रा.पूजा पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.