Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज नगरपरिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींना निधी वाटप

                               (सर्व छायाचित्रे मज्जिद किल्लेदार) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज नगरपरिषदेमार्फत दिव्यांग कल्याण कार्यक्रम अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना निधी वाटप करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी स्वरूप खारगे उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक श्वेता सुर्वे, कर विभाग प्रमुख भारती पाटील, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख अवंती पाटील, मिळकत विभाग प्रमुख रविनंदन जाधव, विद्युत अभियंता धनंजय चव्हाण, आस्थापन विभाग प्रमुख ओमकार बजागे यांच्या हस्ते निधी मंजुरीचे पत्र दिव्यांग लाभार्थींना देण्यात आले.

स्वागत व प्रस्ताविक नगरपरिषदेचे सह प्रकल्प अधिकारी जयवंत वरपे यांनी केले. यामध्ये त्यांनी निधी बाबतची तरतूद व स्वरूप स्पष्ट केले. दरवर्षीप्रमाणे  चालू आर्थिक वर्षात नगरपरिषदेने उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवला होता. त्याचे वितरण करताना प्रशासकीय ठरावातील तरतुदीनुसार  तसेच शासन निर्णयाच्या अधीन राहून दिव्यांग टक्केवारीच्या प्रमाणात श्रेणी तयार केली असून त्याप्रमाणे अनुक्रमे श्रेणी ए गटातील व्यक्तींना प्रत्येकी नऊ हजार रुपये, श्रेणी बी गटातील व्यक्तीला प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये, व श्रेणी सी गटातील व्यक्तीला प्रत्येकी सहा हजार पाचशे रुपये असे एकूण २८३ नोंदणीकृत  लाभार्थ्यांना २० लाख २५ हजार ५०० रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करत असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जयवंत वरपे यांनी सांगितले. यावेळी मिळकत विभाग प्रमुख रविनंदन  जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

दिव्यांग संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी स्वरूप खारगे, दिव्यांग कक्ष विभाग प्रमुख जयवंत वरपे, समुदाय संघटक संदीपकुमार कुपटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन काकासाहेब भुईंबर यांनी केले. आभार समुदाय संघटक संदीपकुमार कुपटे यांनी मानले.





                                        (सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार )


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.