![]() |
| भडगाव: येथील श्रमसंस्कार शिबीरात हिरण्यकेशी नदीघाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील कचरा गोळा करताना संत गजानन इंजिनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा भडगाव येथे श्रमसंस्कार शिबिर विविध उपक्रमाने उत्साहात झाला.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एच सावंत होते. शिबिराचे उदघाटन मंडल कृषी अधिकारी रंजना देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
सात दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांनी हिरण्यकेशी नदीकाठ व रस्त्याची स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी प्रा. संभाजी देसाई यांनी 'पाणी आडवा पाणी जिरवा' व रंजना देशमुख यानी आधुनिक शेती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. 'बेटी बचाव बेटी पढाओ', 'पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापन' या विषयावर गावातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. तसेच पथनाट्याची सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रा. एस. जी. स्वामी यांनी संगणक विषयी मूलभूत माहिती दिली. दरम्यान, मतदान जनजागृती व ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. या शिबिरात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.
यावेळी सरपंच वंदना शेडुंरे, रविशंकर बंदी ,हरिदास बोंगे, राणी खमलेट्टी,प्रा.एस.ए.चौगुले, प्रा. एस. जी. खोत व विविध पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. शिबिर समन्वयक म्हणून प्रा.संभाजी गावडे, प्रा. दिपक मोरे यांनी काम पाहिले.


