गडहिग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयात 'महिंद्रा प्राईड क्लासरूम अंतर्गत नंदी फौंडेशन मार्फत' बी.सी.ए.भाग एकच्या विद्यार्थिनीना कंपनीच्या सी.एस.आर.योजनेतून विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी सहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रारंभी प्लेसमेंट विभागाचे प्रा.बी.एस.पठाण यांनी स्वागत करून प्रास्ताविकात प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट केला. कंपनीच्या प्रशिक्षिका सपना सूद व शिल्पा खुणे यांनी विद्यार्थीनीना सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचा लाभ देत आहोत. या प्रशिक्षणातून तुम्हाला तुमच्या कौशल्य सुधारण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून विद्यार्थिनीनी या प्रशिक्षणातून आपले करिअर घडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिवाय या प्रशिक्षणामध्ये रोजगार क्षमता विकास, कौशल्य विकास, व्यक्तीमत्व विकास, मुलाखत तंत्र आदींबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी सहा दिवसांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना काय शिकता आले. सदरचे प्रशिक्षण आपणास भविष्यात नोकरीकरिता पुरेसे आहे का? या प्रशिक्षणाचा आपणाला पुरेसा लाभ झाला आहे का? याबाबत प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीशी मुक्त संवाद साधला.
सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बी.सी.ए.विभाग प्रमुख प्रा.के.एस.देसाई, प्रा.आझाद पटेल, प्रा.रवी खोत, प्रा.यु.एस.पाटील, प्रा.एम.पी.कांबळे, प्रा. विक्रम शिंदे उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये बी.सी.ए.भाग एकच्या १२६ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.





