Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात विज्ञान दिन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत होते. 

यावेळी एआयसीटीई स्पाईसेस योजनेअंतर्गत इनोव्हेशन क्लब मार्फत पोस्टर व प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील विजेत्यांना  प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी डॉ.ए.ए.माने, प्रा.एस.बी.पोवार, प्रा.पी.एस. चिंदी, डॉ.एम.बी.मोहिते उपस्थित होते. समन्वयक म्हणून प्रा.एन.बी.पठाण यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन कादंबरी गुरव, अनिकेत जाधव, सुशील नाईक, सोनाली पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.